प्रतिनिधी / निपाणी
निपाणीत ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिस्ती बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. येथील चर्चमध्ये ख्रिसमसनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळपासून दुपारपर्यंत प्रार्थना, येशूची भक्ती गीते तसेच लहान मुलांचे नृत्य असे कार्यक्रम झाले.
ख्रिसमसनिमित्त रेव्ह. सुनील गायकवाड यांनी संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाचे संकट दूर होऊदे, अशी प्रार्थना प्रभू येशूंकडे केली. यावेळी उपस्थित मुला-मुलींनी प्रभू येशूंची गीते तसेच नृत्य सादर केले. ख्रिसमसनिमित्त चर्चमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शहरातील सर्वच चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना झाली.
नागरिकांनी एकमेकास ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी एस. एम. सकट, सचिन हेगडे, संदेश सुतार, किसन दावणे, दीपक सकट, अनिल हेगडे, संजय हेगडे, अतुल सकट, तुषार हेगडे, अविनाश हेगडे, पोपट हेगडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.









