विद कॉन अबू धाबीमध्ये सामील होणार
बॉलिवूडमध्ये स्वतःच्या सौंदर्यासह नृत्यकौशल्याने सर्वांना वेड लावणारी नोरा फतेही लवकरच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सर्वांची मने जिंकण्यास सज्ज आहे. इंटरनॅशनल सेंसेशन निक जोनस आणि केहलानीसोबत अबूधाबीत स्वतःचे कलाकौशल्य दाखवून देण्याची संधी नोराला मिळाली आहे. नोरा आता आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात स्वतःच्या काही गाण्यांवर नृत्य करताना दिसून येईल. अलिकडेच सत्यमेव जयते 2 या चित्रपटातील ‘कुसु कुसु’ या तिच्या गाण्याला जगभरातील चाहत्यांकडून दाद मिळाली आहे.

यापूर्वी नोराने पॅरिसमधील ओलंपिया ब्रूनो कोक्वेट्रिक्समध्ये अरेबिक आणि भारतीय नृत्य तसेच गायनासह इतिहास रचला होता. प्रतिष्ठित स्थळ ओलंपियामध्ये स्वतःचे कलाकौशल्य सादर करणारी नोरा ही बॉलिवूडमधील एकमात्र कलाकार आहे. चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केल्यावर नोरा आता ग्लोबल आयकॉन म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे.









