ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने दक्षिण भारतातील बेटे आणि समुद्रकिनाऱयाचे अंतराळातून फोटो टिपले आहेत. यामध्ये एक दिवसा घेतलेला फोटो आहे. तर दुसरा रात्रीचा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे फोटो नासाने प्रसिद्ध केले आहेत.
रात्रीच्या वेळी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधून घेतले गेलेले फोटो एकदम स्पष्ट आहेत. या फोटोतून कोच्ची आणि कोईम्बतूर यासारख्या शहरांमध्ये किती बदल झाले आहेत, याची माहिती मिळते. दोन्ही शहरांना जोडणारे हायवे आणि दिवे या फोटोतून स्पष्ट दिसतात. हे फोटो काढण्यात आपले अंतराळवीर यशस्वी झाले आहेत.
दिवसा घेतलेला फोटो जेमिनी 11 स्पेसक्राफ्टच्या क्रू ने घेतलेला आहे. यामध्ये समुद्र किनारे आणि जमिनीचा पृ÷भाग दिसतो. अंतराळातून नासाचे स्पेस स्टेशन 24 तासात दिवसातून 16 वेळा भारताच्या भूभागावरून जाते.










