बेळगाव / प्रतिनिधी
आषाढी एकादशी व जोतिबाच्या दिवसानिमित्त येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात विठ्ठलाच्या मूर्तीला आकर्षक आरास करण्यात आली आहे.
सकाळी मंदिरात ज्योतिबा आणि विठ्ठलाला अभिषेक करून खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. तसेच दुपारी बारा वाजता महाआरती करून सर्वांना खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.
यंदा पहिल्याच वषी जोतिबा मंदिरात विठ्ठलाची मूर्तीला आकर्षक आरास केली. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दादा अष्टेकर भक्त मंडळ परिवारातर्फे करण्यात आले आहे.









