प्रतिनिधी / बेळगाव
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नार्वेकर गल्ली येथील एन. जी. बॉईजच्या मुलांनी 25 फुटी ओल्डमॅन तयार केला आहे. यावर्षी ‘चायनीज वॉरियर’ ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. टाकाऊ साहित्यापासून हा ओल्डमॅन तयार करण्यात आला आहे. मागील 14 वर्षांपासून हे युवक ओल्डमॅन तयार करीत आहेत. मागीलवर्षी 15 फुटी ओल्डमॅन तयार केला होता. यावर्षी 25 फुटी ओल्डमॅन 8 दिवसांपासून तयार करीत आहेत. गवत, पेपर, बांबू एकत्रित करून ओल्डमॅन तयार करण्यात आला आहे.









