ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भाजपचे माजी आमदार आणि अभिनेते परेश रावल यांनी काँगेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, फुकटच्या बंगल्यात राहून नातीने आजीचे नाक कापले, अशी टीका परेश रावल यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्राने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना लोधी रोड येथील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांना 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
मात्र, काँग्रेसने हा निर्णय सूड बुध्दीने घेतला आहे, असे म्हटले आहे. गांधी या गेल्या काही दिवसापासून उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे सूडबुद्धीने हा निर्णय घेतला गेला, असा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.









