पेडणे/ प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात नागरिकांनी आपल्या घरातच राहून सुरक्षित रहावे आणि कोविड 19 च्या या महाभयंकर अशा आजाराचा देशवासियांनी एकसंघ होऊन सामना करुया असे आवाहन केंद्रीय आयुष मंञी श्रीपाद नाईक यांनी महाखाजन पेडणे येथे येऊन पेडणेतील जनतेला केले.
शनिवारी सकाळी केंद्रीय आयुषमंञी श्रीपाद नाईक यांनी महाखाजन धारगळ येथे भेट देऊन पेडणे तालुक्मयातील नागरिकांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. यावेळी मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे , थिवी मतदारसंघाचे आमदार निळकंठ हळर्णकर , माजी मंञी दिलीप परुळेकर , उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंदा अस्नोडकर , पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस , मांदे भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आयुष मंञी श्रीपाद नाईक यांनी पेडणे तालुक्मयाचा ला?कडाऊन काळातील आढावा मांदे मतदारासंघाचे आमदार दयानंद सोपटे यांच्या कडून घेतला. पेडणेतील नागरिकांनी ला?कडाऊन काळात आपल्या घरातच रहा आणि सुरक्षित रहा असे आवाहन केले.. यावेळी पोलिसांना तसेच नागरिकांना मास्कचे वितरण करण्यात आले.









