समांथा रुथ प्रभूसाठी 2022 हे वर्ष अत्यंत व्यस्ततेचे राहणार आहे. तिच्याकडे अनेक चित्रपट आणि ओटीटी शोजच्या ऑफर्स आहेत. स्वतःच्या नव्या जीवनाचा मी आनंद घेत आहे. स्वतःला कामात गुंतवून घेतले आहे. माझ्या आगामी प्रोजेक्टसाठी मी अत्यंत उत्साही असून ते अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. प्रत्येक प्रोजेक्ट इतरांपासून वेगळा असल्याने 2022 हे वर्ष माझ्यासाठी रंजक ठरणार असल्याचे समांथाने म्हटले आहे. समांथा आणि नागा चैतन्यने ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट घेतला होता. 2017 साली दोघेही विवाहबद्ध झाले होते.

सामंथाचे पुष्पा ः द राइज चित्रपटातील स्पेशल आयटम नंबर प्रदर्शित झाले आहे. अभिनेत्रीचे बहुप्रतीक्षित आयटम साँग ‘ऊ अंतवा…मावा…ऊ.. अंतवा..मावा’ 10 डिसेंबर रोजी चाहत्यांसाठी उपलब्ध झाले आहे. या गाण्यातील समांथाच्या जबरदस्त लुकने पूर्वीच इंटरनेटवर खळबळ उडवून दिले आहे. गाण्याच्या चित्रफितीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याला इंद्रावती चौहान यांनी आवाज दिला असून देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले आहे.









