ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नव्या काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसाठी येत्या मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला उपस्थित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.
काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च धोरण तयार करणाऱ्या काँग्रेस वर्किंग कमिटीचीची (सीडब्ल्यूसी) आज दिल्लीतील पक्ष मुख्यालयात ऑनलाईन पद्धतीने बैठक झाली. सोनिया गांधी सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्षांची जबाबदारी सांभाळत आहेत.
बैठकीत सोनिया गांधींनी अर्णब गोस्वामी यांच्या कथित व्हॉट्सॲप संभाषणाचा संदर्भ देत म्हणाल्या, इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाची प्रमाणपत्रे देणारे इतर लोक आता उघडे पडले आहेत. सरकार त्यावर गप्प आहे. सरकारला खासगीकरणाची घाई झाली आहे. सोनिया यांनी अर्थव्यवस्थेवरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला.









