ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एकीकडे जगाला कोरोनाने विळखा घातला असतानाच दुसरीकडे पृथ्वीवर नवे संकट ओढावले आहे. येत्या दोन दिवसात पृथ्वीच्या जवळून 5 उल्का जाणार आहेत. त्या पृथ्वीपासून 46.5 मैलांपेक्षा कमी अंतरावरून जाणार आहेत. अमेरिकेन संशोधन संस्था ‘नासा’ने याबाबतचा अलर्ट दिला आहे.
मंगळवारी रात्री दोन उल्का Asteroid 2013XA22 (310 फूट, 18 दशलक्ष मैल दूर) आणि Asteroid 2020KZ3 (64 फूट, 7 दशलक्ष 61 हजार मैल दूर) पृथ्वीच्या जवळून गेल्या आहेत. यामुळे कोणतीही हानी झाली नाही. आज (बुधवारी) 65 फूट लांब उल्का Asteroid 2020KY 40 मैलांवरून जाईल. यानंतर उद्या (गुरुवारी) आणखी एक 65 फूट लांब उल्का 36 लाख मैलांवरून जाईल, असे नासाने म्हटले आहे.
मागील आठवड्यातही पाच उल्का पृथ्वीच्या दिशेने आल्या होत्या. मात्र, त्या दूरून गेल्याने भीती टळली. यामुळे भविष्यातील संभाव्य धोक्यांकडे वैज्ञानिकांचे लक्ष कायम आहे. नासाची Sentry सिस्टमही यावर लक्ष ठेवून आहे. पुढच्या 100 वर्षांत अशा 22 उल्का येणार असल्याचा इशाराही नासाने अगोदरच दिला आहे.









