वृत्तसंस्था/ मुंबई
युरोपियन कार निर्मिती कंपनी स्कोडा ही नवीन वर्षात आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. नवीन उत्पादन निर्मितीसाठी आवश्यक असणारा खर्च वाढत जात असल्याने हा निर्णय कंपनी घेणार असल्याचा अंदाज आहे.कंपनी 1 जानेवारी 2021 पासून कारच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढविण्याचे संकेत आहेत.
देशातील वाहनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल आणि अन्य साहित्यांच्या किमती महागल्याने व विनिमय दरांमध्ये होत असणाऱया चढउताराच्या कारणास्तव जानेवारी 2021 पासून किमतीत वाढ करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कंपनी या वाढीव किमतीचे नियोजन करत असून एक जानेवारीपासून विविध मॉडेलवरील किमतीत अडीच ते तीन टक्के वाढ करण्याचा विचार कंपनी करीत असल्याचे सांगण्यात आले.









