वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन वर्षामध्ये(2020) खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तब्बल सात लाख नोकऱया उपलब्ध होण्याचे अनुमान आहे. तर यातून मिळणारे वेतनही 8 टक्क्यांनी वाढीव मिळण्याचे संकेत आहेत. अशी माहिती मायहायरिंगक्लब डॉट कॉम आणि सरकारी नोकरी डॉट इन्फोच्या रोजगार सर्वेक्षणातून देण्यात आली आहे.
स्टार्टअप कंपन्यांमधील रोजगार
स्टार्टअप कंपन्यांमध्ये प्रत्येक क्षेत्रात सर्वाधिक रोजगार प्राप्ती होण्याचे अनुमान आहेत. यात 42 प्रमुख शहरातमधील 12 उद्योग क्षेत्रातील 4,278 कंपन्यांचा समावेश आहे. 2020मध्ये जादाचा रोजगार हा किरकोळ आणि ई-कॉमर्स क्षेत्रात 1,12,000 रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
2020 मध्ये सर्वाधिक रोजगार प्राप्ती होणार असल्याचा विश्वास रोजगारांसंबंधीची माहिती देणाऱया संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी व्यक्त केला आहे.
क्षेत्र आणि रोजगार प्राप्ती
माहिती तंत्रज्ञान आणि आयटी क्षेत्र 1,05,500
आरोग्य सेवा……………… 98,300
एफएमसीजी……………… 87,500
पुनर्निर्माण………………… 68,900
बँकिंग आणि आर्थिक विमा सेवा 59,700
मुख्य शहरांचा समावेश
बेंगळूर, मुंबई, दिल्ली-एनसीआर, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे आदी शहरांमध्ये 5,14,900 नोकऱया प्राप्त होण्याची माहिती आहे. तर अन्य रोजगार दुसऱया आणि तिसऱया श्रेणीतील शहरांमध्ये उपलब्ध होण्याची माहिती आहे.








