प्रतिनिधी /पणजी
राजपथ नवी दिल्ली येथे आज झालेल्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये गोवा राज्याने आपला चित्ररथ सादर केला.
गोव्याचा चित्ररथ गोव्याची महत्त्वपूर्ण स्मारके आणि गोव्याचा सांस्कृतिक खजिना या संकल्पनेवर तयार केला होता ज्यात गोवा हेरिटेज, आग्वाद किल्ला, आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारक, दोनापावला, ईफ्फी, शिगमोत्सव आणि संगीत व नृत्याच्या थेट सादरीकरणाद्वारे कुणबी लोकनृत्याचे प्रतीक आहे. गोव्याचा समृद्ध संगीत वारसा विविध राजवटीचा प्रभाव प्रतिबिंबित करतो. या चित्ररथात वैशिष्टय़पूर्ण नृत्य सादर करण्यात आले.
फोंडा येथील श्री सुशांत खेडेकर यांची चित्ररथाची संकल्पना असून एकूण 18 कलाकारांनी आकर्षक संगीत आणि दोनापावला येथील रमणीय रॉकी पर्यटकांच्या आकर्षणाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक संगीत आणि ढोल, तासो यांच्या तालावर सादरीकरण केले आहे. राजपथावर जेव्हा गोव्याचा चित्ररथ आला तेव्हा प्रेक्षकांनी टाळय़ा वाजविल्या.
गोव्यातील श्री मुकेश घाटवळ आणि बिपीन खेडेकर यांनी संगीत दिले आहे.
अरुणाचल प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मेघालय, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश असलेल्या केंद्रशासित प्रदेशांसह देशातील एकूण 12 राज्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि तांत्रिक पैलू चित्रण करणारे चित्ररथ सादर केले. याशिवाय घ्ह्ग्aŸ75, आझादी का अमृत महोत्सव भारताच्या गौरवशाली भूतकाळाचे प्रतीक आहे आणि समृद्ध आणि आनंदी उद्याची नागरिकांची आकांक्षा प्रतिबिंबित करतो. गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिध्दी खात्याच्या संयुक्त विद्यमाने गोव्याचा चित्ररथ सादर करण्यात आला.









