ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण जगात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. भारतात तर दररोज रुग्ण संख्या उच्चांक गाठत असून देशात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने 38 लाखांचा आकडा पार केला आहे.

भारतात मागील 24 तासात आता पर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 83 हजार 883 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1,043 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 38 लाख 53 हजार 407 वर पोहचली असून, मृतांची संख्या 67 हजार 376 एवढी आहे.
सध्या देशात 8 लाख 15 हजार 538 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 29 लाख 70 हजार 493 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत देशात 4 कोटी 55 लाख 09 हजार 380 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 72 हजार 179 रुग्णांची तपासणी बुधवारी एका दिवसात करण्यात आली.









