इस्पुर्ली येथील श्री हलसिद्धनाथ यात्रा उत्साहात पार
प्रतिनिधी / कोल्हापूर
इस्पुर्ली ता. करवीर येथील श्री क्षेत्र हलसिद्धनाथ यात्रा दि. १६ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली. यात्रेदरम्यान गावातील सर्व भाविक श्री हलसिद्धनाथ येथे जमतात ज्याच्यामध्ये धनगरी ढोल वादनासह मंदिर प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर भगरबाई नामक ठिकाणावर देवाची भेट झाली. तेथुन सर्व भाविक आणि मानकऱ्यांसह सर्वांचा मंदिर प्रवेश करत काही वेळ ढोल कैताळ वादनाने हेडाम खेळ झाला.
यानंतर श्री हलसिद्धनाथ मुख्य भाकणुकीला आरंभ झाला. भाकणूक वाघापुर येथील कृष्णात ढोणे यांनी यांनी केली. भाकणूकीत उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळा उन्हाळा होईल. उन्हाळा आणि पावसाळा यांचे कालमान बदलत जाईल, मनुष्याला नवे नवे रोग येतील, येणाऱ्या रोगांपुढे डॉक्टर ही हात टेकतील. तसेच कष्टानं मिळवशीला तर सुखानं खाशीला अशी भाकीत केले गेले. या भाकणुकीच्या कार्य़क्रमानंतर प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाने या यात्रेची सांगता झाली.