प्रतिनिधी/ पणजी
सांखळीतून गुजरातमध्ये जाऊन तेथेन सुमारे 3500 कि.मी.चे ‘नर्मदा परिक्रमा’ यात्रा पायी चालत पूर्ण करून गोव्यात परतलेल्या श्रीराम प्रभाकर बाक्रे यांच्या ‘नर्मदा परिक्रमा एक अनुभव’ या विषयावरील विशेष कार्यक्रमाचे आयोजन सांखळी येथे येत्या रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी केले आहे.
बिल्वदल सांखळी या संस्थेने विठ्ठलापूर सांखळी येथील वे. घन:शामशास्त्राr जावडेकर सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असून या अंतर्गत ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2020 या दरम्यान 3500 कि. मी. चा पायी केलेला प्रवास त्य़ातून अनेक प्रसंगाना तोंड देत संघर्षमय अशा यात्रेतील स्वानुभव कथन श्रीराम बाक्रे हे करतील या शिवाय स्लाईड शो द्वारे उपस्थितांना संपूर्ण माहिती देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम रविवार दि. 2 फेब्रुवारी सायं. 4 वा. होईल. कार्यक्रम सर्वांना खुला असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिल्वदल या संस्थेने केले आहे.









