सेन्सेक्स 186 तर निफ्टी 66 अंकांनी घसरले
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील मंगळवारी दुसऱया सत्रात भारतीय बाजाराची घसरण राहिली आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीत प्रामुख्याने नफा वसुलीच्या प्रभावाने आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि इन्फोसिसचे समभागात घसरण राहिली आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 186 अंकांनी प्रभावीत झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर सेन्सेक्स 185.93 अंकांसह 0.35 टक्क्यांच्या घसरणीसोबत निर्देशांक 52,549.66 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 66.25 अंकांसोबत 0.42 टक्क्यांनी प्रभावीत निर्देशांक 15,748.45 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी कोटक बँकेचे समभाग मंगळवारी सर्वाधिक म्हणजे एक टक्क्यांनी घसरला आहे. यासोबतच आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज ऑटो, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, स्टेट बँक तसेच ऍक्सिस बॅकेचे समभाग नुकसानीत राहिले असल्याचे पहावयास मिळाले आहे.
दुसऱया बाजूला महागाई संदर्भात जोडण्यात आलेल्या काळजीने आणि कालावधीच्या अगोदर व्याजदरात केलेल्या वृद्धीमुळे शेअर बाजारातील वातावरण नकारात्मक राहिले आहे. अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, डॉ.रेड्डीज लॅब तसेच नेस्ले इंडियाचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.
प्रमुख क्षेत्रांची कामगिरी
यामध्ये दिवसभरात धातू आणि बँकेच्या समभागात मोठय़ा प्रमाणात समभाग विक्री राहिल्याने सेन्सेक्स व निफ्टी घसरणीसोबत बंद झाले.
आर्थिक पॅकेजवर नाराजी
सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना कालावधीतील अडचणींचा सामना करत असणाऱया क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. परंतु या घोषणेचा दुसऱया दिवशी मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात सकारात्मक प्रभाव न राहता बाजाराने यावर नाराजी दर्शवली असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
देशातील बाजारात मंदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी राहिल्याने भारतीय रुपया मंगळवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत जवळपास 7 टक्क्यांची घसरण नोंदवत 74.26 चा स्तर गाठला आहे.








