प्रतिनिधी / पणजी

भाजपच्या ‘सेवा ही संघटन’ या मोहिमेची माहिती गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे व संघटनमंत्री सतीश धोंड यांनी भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे. पी. नड्डा यांना ऑनलाईन पद्धतीने दिली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनीही चर्चेत भाग घेतला. गोव्यातील संघटन कार्याचा नड्डा व रवी यांनी आढावा घेतला. गोव्यातील विविध भागात भाजपने केलेल्या कार्याचा अहवाल त्यावेळी तानावडे व धोंड यांनी सादर केला. नड्डा यांनी गोवा प्रदेश भाजपच्या एकंदरीत कार्याबाबत प्रशंसा केली.









