प्रतिनिधी/ सातारा
पावसाळय़ाच्या तोंडावर भुयारी गटर योजनेचे काम हाती घेतले गेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवक विजय काटवटे यांनी आत्मदहनाचा तर बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार ठेकेदाराने खोदलेले खड्डंs बुजवण्याचे काम हाती घेतल्याचे चित्र रविवार दिसत होते.
मंगळवार तळय़ाकडे जाणारा रस्ता युनियन भाजी मंडई पासून अनंत इंग्लिश स्कूल चौकापासून पुढे तळय़ापर्यंत व कोल्हटकर आळी, जंगी वाडा परिसर येथे
खुदाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना धड चालताही येत नाही. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरसेवक विजय काटवटे यांनी दहा दिवसाचा अल्टीमेटम देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता तर बांधकाम सभापतीं सिद्धी पवार यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रविवारी ठेकेदाराने खोदलेले रस्ता मुजवण्याचे काम हाती घेतले होते. त्यातमध्ये खडी टाकून त्यावर रोलर फिरवून काम करण्यात येत होते.








