ऑनलाईन टीम / नंदुरबार :
नंदुरबारमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे.हा रुग्ण आढळलेला संपूर्ण परिसर सील करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.
नंदुरबार शहरातील एका नागरिकाला गुरुवारी कोरोनाची लक्षणे आढळली. त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली. शुक्रवारी रात्री त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नंदूरबारमध्ये कोरोनाचा हा पहिलाच रुग्ण आहे. जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य प्रशासनही धास्तावले असून, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.