प्रतिनिधी/ गोडोली
नागेवाडीच्या डोंगरातील 1983 पासून नैसर्गिक संपत्ती असलेल्या गौण खजिन्याची महसूल अधिकाऱयांना हाताशी धरून धुरळा उडवत बेसूमार लुटालुट केली आहे.खाण,क्रशर,मोकळया जागांची लिज संपले तरीही अर्थपूर्ण तडजोड करून सुरू आहेत.तब्बल 35 खाणी, 42 क्रशर लिज संपले तरी ही सुरू असताना त्यांचयावर कारवाई न करणाऱया सर्व जबाबदार अधिकाऱयांची चौकशी करावी.तसेच डोंगरातील खाण सम्राटांनी आजपर्यंत केलेल्या लुटालुटीची इंचन इंच मोजणी करून दोषींच्यावर हरित लचावदा,प्रदुषण विभाग,महसुल विभागाने कठोर कारवाई करावी.ती केली नाही तर उच्च् न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे जनमाहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा आणि त्यांना लेखी निवेदन देऊन इशारा दिला आहे.
नागेवाडीच्या हद्दीत गेली काही वर्षे सुमारे 35 दगड खाणी आणि 42 क्रशर अनाधिकृत सुरू आहेत. मंथली घेत महसूल कर्मचारी,अधिकाऱयांनी.2017 पुर्वीच्या आणि अलिकडे मार्च 2020 अखेरपर्यंतच्या जवळपास सर्वांचे लिज संपले आहे. फक्त तीन व्यवसायिकांचे मार्च 2021 अखेर लिज आहे.याची जनमाहिती अधिकारातून वेळोवेळी माहिती गोळा केल्याने त्यातून उघड झाले आहे.लिज संपले तरी ही एक ही दगड खाणी,क्रेशर महसूल विभागाने अद्याप ताब्यात घेतले नाही.कोणाच्या वरदहस्ताने या बेकायदेशिरपणे खाणी,क्रशर सुरू आहेत,याचा जिल्हा प्रशासनाने खुलासा करावी.पर्यावरणाची हानी आणि प्रदुषण होत असताना ही प्रदुषण विभाग ही शांत ठेवण्यात खाण सम्राट नेहमीच यशस्वी झाल्याचा आरोप मोरे यांनी तरूण भारत शी बोलताना केला.
खाण,क्रशरच्या धुरळयाने नागेवाडीकरांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे, याबाबत जिल्हा प्रशासनाला गांभिर्य नाही.उलट जिल्हयातील लिज संपलेल्या अनेक खाणी,क्रशर सुरू आहेत. पैशाच्या जोरावर आणि महसूल विभागाशी संगनमत ठेवून शासनाचा महसूल बुडवून होणारी ही पर्यावरणाची हानी थांबवा.मनुष्य आणि वित्त हानी करणाऱयास दोषी असणाऱया सर्व शासकिय अधिकारी,कर्मचारी,खाणी,क्रशर सम्राटांच्यावर कारवाई झाली पाहीजे.ती केली नाही तर याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा चर्चा आणि लेखी निवेदन देऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी देत खाणी,क्रशर सम्राट आणि मंथलह घेणारांची झोप उडवली आहे.
दमबाजी,पळापळी,विनवण्या
लिज नसताना गौण खजिन्याचे उत्खन्नन करणाऱया खाणी,क्रशर सम्राट आणि महसूल विभागाचा पोलखाल तरूण भारत ने दि.23 नोव्हेंबरच्या अंकातून चव्हाटयावर आणला.त्यानंतर महसूल विभागाने खाण,क्रशर सम्राटांना चांगलेच झापडले. “बातम्या थांबवा,”अशी दमबाजी केली.त्यानंतर दिवसभर ही सम्राट मंडळींनी पळापळ करून अनेकांशी संपर्क केला.रात्री उशिरापर्यंत विनवण्या करत चांगलेच घायकुतीला आले.प्रकरण आता उच्च न्यायालय आणि हरित लवादयात जाणार असल्याने कायदयाच्या कचाटयात सम्राट मंडळींसोबत महसूल मधील संबंधित अडकणार असल्याचे जवळपास उघड आहे.
तरूण भारत समोर मांडले सबळ पुरावे
नागेवाडी हद्दीतील बेकायदेशिर गौण खजिन्याच्या उत्खन्नाना बाबतचे कागदोपत्री आणि लाईव्ह पुरावे गेली काही महिने गोळा केले आहे. या खाण,क्रशर गौण खजिन्याचे उत्खन्नन करणाऱयांच्या विरोधात जनहित याचिकेसाठी आवश्यक सबळ पुरावे असलेल्या दोन मोठया पिशव्या आणि 32 जीबी पेनड्राव्ह मधी लाईफ पुरावे तरूण भारत च्या कार्यालयातील प्रतिनिधींना दाखवून देत या प्रकरणी सत्यता आणि तीव्रता सांगून आता माधार नाही,असे सुशांत मोरे यांनी स्पष्ठ केले. कागदोपत्री कारवाईचा फार्स करणाऱया यापूर्वीच्या शासकिय कर्मचारी,अधिकाऱयांच्या सुध्दा विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.1983 पासून उत्खन्नानाच्या चौकशीची न्यायालयात मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तरूण भारत शी बोलताना केली.








