बसवण्णा ट्रॉफी-2022 क्रिकेट स्पर्धेत अनेक संघांचा सहभाग
वार्ताहर /धामणे
श्री शिवशक्ती युवक मंडळाच्यावतीने बसवाण्णा यात्रेनिमित्त बसवाण्णा ट्रॉफी-2022 या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि. 30 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धा हट्टी रोडवरील मराठी शाळेच्या पटांगणावर आयोजित केल्या आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन ग्राम पंचायत सदस्य एम. के. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर यष्टीपूजन सुनील चौगुले, हेमंत पाटील, शंकर रेमाणाचे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पंचायत माजी सदस्य रमेश गोरल, येळ्ळूर यांनी बॅटिंग करून स्पर्धेचे उद्घाटन केले.
या स्पर्धेत विजेत्याला 15 हजार रुपये आणि ट्रॉफी आणि उपविजेत्याला 8 हजार रुपये व ट्रॉफी तसेच सामनावीर, मालिकावीर यांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सदानंद येळ्ळूरकर, युवराज मादाकाचे, बसवंत पाटील, महेश पाटील, अमोल हट्टीकर, नितीन पाटील, परशराम पाटील आणि क्रिकेट संघ व गावातील युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष बाळू केरवाडकर यांनी केले.









