वार्ताहर / धामणे
धामणे ग्राम पंचायतने गटारी स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केल्याने डासांचे प्रमाण वाढले असून येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
धामणे बसवाण गल्ली येथील बसवाण्णा मंदिर समोरील गटारीत मोठय़ा प्रमाणात घाण साचून विषारी वेल वाढली असून या गटारीतून सांडपाणी साचले आहे. त्यामुळे येथे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावचे आराध्य दैवत बसवाण्णा मंदिरसमोरील ही गटार साफ करणेबद्दल ग्राम पंचायतीकडे येथील नागरिकांनी कळवून देखील याकडे साफ दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कारण जर मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला तर या गटारीचे पाणी बसवाण्णा मंदिर आवारात साचत असून त्यामुळे येथे दुर्गंधी पसरत आहे. अशा पवित्र मंदिर समोरील ही गटार ग्राम पंचायतीने तातडीने साफ करून मंदिराचे तरी पावित्र्य राखावे, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.









