हरपवडे पैकी निवाचीवाडी येथील त्या महिलेच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
वेतवडे/प्रतिनिधी
धामणीखोऱ्यात हरपवडे पैकी निवाचीवाडी येथे 44 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडली असताना त्याच महिलेच्या 27 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धामणीखोऱ्यात चिंता वाढली आहे 18 मे रोजी ती महिला आपले पती व दोन मुलांसह मुंबईतुन गावी आली होती. त्यांंच्यासह कुटूंबातील तीन जणांचे सिपीआरमध्ये स्वँब देऊन हरपवडे येथील प्राथमिक शाळेत ठेवले होते त्यानंतर त्यांना पन्हाळा प्रशासनाच्या वतीने संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवले होते.
त्यापैकी आज दुपारी त्या 44 वर्षीय महिलेच्या मुलाचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने पन्हाळा प्रशासनाच्यावतीने त्यांंना सी.पी.आर कोल्हापूर येथे हलविले आहे. धामणीखोऱ्यात बारावा कोरोना रुग्ण आढळल्याने भागात खळबळ उडाली असुन संपूर्ण धामणीखोऱ्यातील नागरिकांनी धसका घेतला आहे.








