प्रतिनिधी/ बेळगाव
कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आहे. यासंबंधी शुक्रवारी कटकोळ पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
15 वषीय पिडीत मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या संबंधी हणमंत फकिराप्पा गुग्गरी (रा. कटकोळ) याच्यावर भा.दं.वि. 366(ए), 323, 504, 506 सहकलम 34 व पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
15 वषीय मुलीचे अपहरण करुन तिला त्याने आपल्या बहिणीच्या घरी ठेवले होते. तुझ्या घरातील मंडळींना जीवे मारतो, असे धमकावून त्या मुलीचे अपहरण करण्यात आले असून कटकोळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.









