खुपीरेतील धनगर बांधवांना सरपंच संजय पाटील यांच्याकडून हृद्य निरोप
वाकरे/प्रतिनिधी
ल्हापूर जिल्ह्यातील अति पावसामुळे कांही महिन्यांसाठी सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागात स्थलांतर करणाऱ्या खुपीरे (ता.करवीर) येथील मेंढपाळ व्यावसायिक धनगर बांधवांना खुपीरेचे सरपंच संजय डी. पाटील यांनी शासनाकडून मिळालेले वीस हजार रुपये अनुदान आणि स्वतःच्या सरपंच मानधनातून पाल अर्थात तंबू भेट देऊन त्यांना पुढील प्रवासासाठी हृद्य निरोप दिला.
खुपिरे येथील धनगर बांधव प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यात सांगली,पंढरपूर, मिरज इत्यादी ठिकाणी आपली बकरी चरण्यासाठी व पावसापासून संरक्षण करण्यासाठी घेऊन जात असतात. यावर्षी कोरोना व महापुरामुळे अनेक अडचणीचा सामना धनगर बांधवांना करावा लागत आहे. कोरोनामुळे यावर्षी बकऱ्यांना पावसामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी धनगर बांधवांना शासनाबरोबर संघर्ष करावा लागला. त्यानंतर उशिरा का असेना शासनाने त्यांना जिल्ह्याबाहेर स्थलांतराची परवानगी दिली.
खूपीरे गावातून धनगर बांधव मोठ्या प्रमाणावर चार महिने जिल्हा बाहेर जातात.त्यांना रानावनात निवारा मिळवा म्हणून सरपंच संजय डी. पाटील यांनी आपल्याला मिळालेल्या सरपंच मानधनातुन धनगर बांधवांना पाल(तंबू) भेट देऊन त्यांना शुभेच्या दिल्या. याप्रसंगी माजी सरपंच तानाजी पाटील, प्रकाश पाटील, दत्ता पाटील, दिलीप पाटील, तानाजी हराळे, मारुती हराळे, शहाजी हरळे, आनंदा पाटील, भगवान जांभळे, संजय हराळे, तुकाराम हराळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Previous Articleउत्तराखंड : शहराच्या तुलनेत डोंगराळ भागात कोरोनाचा संसर्ग अधिक
Next Article मलकापूर उपनगराध्यक्ष निवड बिनविरोध








