प्रतिनिधी / कोल्हापूर
कळंबा कारागृह शिक्षा भोगत असलेल्या ३७ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्वॅब तपासणीअंती स्पष्ट झाले. या कोरोना बांधीत कैद्यांच्यामध्ये सर्वा अधिक वयोवृध्द कैदी आहेत. त्यासर्व कोरोना बाधीत कैद्यांच्यावर कळंबा येथील आयटीआयमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहातील मधील स्वतंत्र कक्षात उपचार सुरु असून, सर्वांची प्रकृती स्थीर आहे. तसेच कळंबा कारागृहातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली असता कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. अशी माहिती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.
कारागृहाचे अधीक्षक शेळके म्हणाले, सांगली कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्याची दखल घेवून पंधरा दिवसापूर्वी कारागृहातील काही कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यावेळी पाच कैद्यांना त्यांची बाधा झाल्याचे उघड झाले. त्यावरुन कारागृहातील सर्वच कैद्यांची स्वॅब तपासणी केली जावी, असे पत्र सीपीआर हॉस्पीटल प्रशासनाला देण्यात आले. आतापर्यत २५० कैद्यांचा स्वॅबची तपासणी केली असता ३७ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








