कोल्हापूर : प्रतिज्ञाचे मैफिलीत गीत सादर करताना डावीकडून गायक सूर्यकांत लोले आणि प्रदीप मिस्किन सोबत निवेदक विजय जाधव.
प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रतिज्ञा नाटÎरंग संस्थेच्या वतीने 21 जून या जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून सहा गीत मैफिली सादर करण्यात आल्या. त्याचबरोबर पार्श्वगायक आणि संगीत संयोजक कै. चंद्रशेखर गाडगीळ आणि कोल्हापूरचे संगीतकार आणि पार्श्वगायक कै. चंद्रकांत कागले यांना सहा सांगीतिक मैफिली द्वारे स्वरसुमनांजली अर्पण करण्यात आली.
कोरोना संकटामुळे सध्या नाटÎगृह बंद असल्याने या मैफिली फेसबुकच्या माध्यमातून रसिक श्रोत्यापर्यंत ऑन् लाईन पद्धतीने पोहचवण्यात आल्या. नऊ गायकांनी अवीट अशा मराठी हिंदी गीतांची पेशकश करत जागतिक संगीत दिन अविस्मरणीय केला. सकाळी ठीक 9 वाजता स्नेहसंगीतप्रतिज्ञा उपक्रमा अंतर्गत सलग 812 दिवसातील सलग अशा 876 व्या मैफिलीत गायक गंगाराम जाधव यांनी `सुर निरागस होवो’, `तू बुद्धी दे’ , `ग साजणी’ या गीतानी मैफिलीस प्रारंभ केला. या मैफिलीचा शेवट `निसर्गराजा ऐक सांगतो’ या गीताने करण्यात आला. या वेळी निवेदक पंडित कंदले यांनी जागतिक संगीत दिनाचा इतिहास विषद करताना पार्श्वगायक कै. चंद्रशेखर गाडगीळ आणि संगीतकार कै. चंद्रकांत कागले यांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा आलेख मांडला.
यानंतर 877 व्या मैफिलीत गायक प्रवीण लिंबड आणि शिवलाल पाटील यांनी `सुख दुख की हर एक माला’, `दूर है किनारा, जो गीत नहीं जन्मा’, `मधुबन खुशबू देता है’, `माना हो तुम’, `गोरी तेरा गांव बडा प्यारा”‘ ही आणि इतर गीते सादर करून रंगत वाढवली. या नंतर 878 व्या मैफिलीत `नफरत की दुनिया को छोड के’, `जाऊ कहा बता ये दिल’, `कभी कभी मेरे दिल में’, `सामने ये कौन आया’, `ओ मनचली कहा चली’, `राजू चल राजू’, `तुम कितनी खूबसूरत हो’ ही आणि इतर गीते गायक सूर्यकांत लोले व अनिल आवळे यांनी सादर केली. या नंतर 879 व्या मैफिलीत गायक शेखर आयरेकर व आनंद पाटील यांनी `खिलते है गुल यहाँ’, `हाल क्या है दीलोंका’, `कभी होती नही है’, `सूरमयी अखियोमे’, `होश वालों को’ या आणि इतर गाणी पेश केली. पुढच्या 880 व्या मैफिलीत गायक गंगाराम जाधव व रमेश कांबळे यांनी `सांज ढले’, `लगी आज सावन की’, `और इस दिल में’, `रुक जाना ओ जाना’, `जीवन से भरी’, `मेरे सपनों की रानी’ या गाण्याची बरसात केली. 881 व्या मैफिलीत सूर्यकांत लोले व प्रदीप मिस्किन या ज्येष्ठ गायकानी `रिम झिम गीरे सावन’, `ईक ना ईक दिन ये’, `सच मेरे यार है’ ही आणि इतर अवीट गाणी सादर केली. निवेदक विजय जाधव यांनी सलग पाच मैफिलींचे निवेदन केले.
मैफिलीच्या मध्यमातून रूग्णाला मदत
दिवसातील 12 तासात या सर्व गायकांनी 80 गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली. या मैफिलीच्या माध्यमातून एका रुग्णास औषधोपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. या मैफिलींना विकास मोने यांचे सहकार्य लाभले. ध्वनी संयोजन रमेश सुतार व ज्ञानेश सुतार, प्रकाश योजना सागर भोसले व मिलिंद अष्टेकर तसेच प्रकाश योजनेची बाजू रोहन व सुनिल घोरपडे यांनी सांभाळली. या मैफिलींचे संयोजन प्रशांत जोशी यांनी केले.