इस्लामपूर/प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील सांगली जिल्हा संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष सुयोग गजानन औंधकर याला सांगली जिल्हा कार्यक्षेत्रातून दोन वर्षे मुदतीकरिता हद्दपार करण्यात आले. आहे.तर सातारा, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्याचे मुख्यालयाच्या ठिकाणी जाणेस दोन वर्षासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.वाळवा उपविभागीय दंडाधिकारी यांनी ही कारवाई केली.
औंधकर याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाणे येथे गर्दी मारामारी, सांगलीत सरकारी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, इस्लामपूर सहा.निबंधक कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे खंडणी मागितल्या प्रकरणी पाच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यास सांगली,सातारा,कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करावे,याबाबत कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत वाळवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(अ),(१) अन्वये हद्दपार प्रस्ताव पाठविला होता.
त्याची सुनावणी उपविभागीय दंडाधिकारी यांच्यासमोर झाली. त्यांनी औंधकर यास दोन वर्षासाठी सातारा,सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात आले. तर त्याचा रहिवास असले संपूर्ण सांगली जिल्हा कार्यक्षेत्रातून घालवून देण्यात आदेश दिले. हा आदेश दि.२४ डिसेंबर रोजी देण्यात आला. या आदेशाची अंमलबजावणी दि.२८ रोजी पासून केल्याचे कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








