मुंबई \ ऑनलाईन टीम
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली. कोरोना ते आरक्षण अशा सर्व विषयांना न्याय देण्याबाबत आम्ही रणनिती ठरवल्याचं या बैठकीनंतर आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
यावेळी आशिष शेलार म्हणाले, राज्यासमोर अतिशय महत्त्वाचे बरेच प्रश्न असताना संपुर्ण अधिवेशन झालं असतं तर जनहितार्थ नाव देता आलं असतं. परंतु सरकारने यापेक्षा छोटं अधिवेशन करता येणार नाही म्हणू दोन दिवसांचे अधिवेशन ठेवलं आहे. या दोन दिवसांमध्ये परिणामकारकसुद्धा शेतकऱ्यांचे मुद्दे, मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, कायदा सुव्यवस्था कोविडबाबत प्रश्न सर्व विषयाला न्याय देण्याचा संदर्भात रणनिती ठरवली आहे. या विषयावर संघटनेचे कार्यक्रम सुद्धा राज्यभर काय करावेत याबाबत विचार सुरु आहे.
नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीतही पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणेच विजय मिळवण्याचा निर्धार भाजपनं केलाय. त्यासाठीही या बैठकीत रणनिती आखण्यात आल्याचं शेलार यांनी सांगितले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








