वार्ताहर / दोडामार्ग:
आगामी दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग बाजारपेठेत येथील पोलिसांनी संचलन केले. दंगा काबू पथकातर्फे हे संचलन झाल्याचे पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दोडामार्ग शहरात आचारसंहिता लागू केली आहे. निवडणूक शांततामय वातावरणात व्हावी, या आदेशाच्या अनुषंगाने अनेक अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत. रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग बाजारपेठ व परिसरात पोलिसांकडून संचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांच्या
प्रमुख मार्गदर्शनाखाली दंगा काबू पथकाने संचलन केले.









