जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 50 वर्षांपासून आम्ही जमीन कसत आहे. मात्र आता सरकारी जमीन म्हणून आमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र जमीन गेली तर जीवन जगणे अवघड होणार आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून ती जमीन कायमस्वरुपी द्यावी, अशी मागणी दोडवाड (ता. बैलहोंगल) येथील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दोडवाड येथील भीमाप्पा सुरप्पा बुदिहाळ, त्यांचे भाऊ बिराप्पा व बसाप्पा हे गेली 50 हून अधिक वर्षे सर्व्हे क्रमांक 593 मधील सहा एकर जमीन कसत आहेत. त्यावरच जीवन अवलंबून आहे. या जमिनी व्यतिरिक्त दुसरी कोणतीही जमीन नाही. याचबरोबर इतर कोणताही व्यवसाय येत नाही. तेव्हा गांभीर्याने विचार करावा व जमीन द्यावी, अशी मागणी केली.









