ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी बाधितांची संख्या किंचितशी घटली. मागील 24 तासात 3 लाख 33 हजार 533 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शुक्रवारच्या तुलनेत बाधितांचा हा आकडा 4171 ने कमी नोंदवला गेला. दरम्यान, शनिवारी दिवसभरात 2 लाख 59 हजार 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 525 रुग्णांचा मृत्यू झाला.
सध्या देशात 21 लाख 87 हजार 205 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 17.78% आहे. आतापर्यंत देशात 3 कोटी 65 लाख 60 हजार 650 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी 46 हजार 393 कोरोना रुग्ण आढळून आले. 30 हजार 795 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









