ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत, असे विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असला तरी लोकांच्या मनात मात्र, ठाकरे सरकारने केलेल्या कामाचे कौतुक आहे. कारण देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान पटकावले आहेत.
या यादीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत. तर मागील तीन सर्वेक्षणात सलग पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण केले आहे.
यावर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले म्हणून पसंती दिली आहे. योगी आदित्यनाथ यांना एकूण 24 टक्के मते मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत ही मते सहा टक्क्यांनी वाढली आहेत. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असतानाही योगी योगींच्या कारभारावर लोक समाधानी आहेत, हेच यातून स्पष्ट होत आहे.
सर्वेक्षणानुसार, पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मते मिळाली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 टक्के मते मिळाले असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी 11 मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
- टॉप 5 मुख्यमंत्र्यांची यादी
योगी आदित्यनाथ : (उत्तर प्रदेश) : 24 टक्के मते
अरविंद केजरीवाल : (दिल्ली) : 15 टक्के मते
जगन रेड्डी : (आंध्र प्रेदश) : 11 टक्के मते
ममता बॅनर्जी : (पश्चिम बंगाल) : 9 टक्के मते
उद्धव ठाकरे (महाराष्ट्र) : 7 टक्के मते









