ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 897 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 31 हजार 332 पोहचली आहे. तर गेल्या चोवीस तासात 73 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशात एकूण मृतांचा आकडा 1007 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभगामार्फत देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 400 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर गुजरात राज्य असून येथे 181 जणांना कोरोनामुळे मृत्यू पत्करावा लागलाय.
देशात कोरोनाची लागण झालेल्या 31 हजार 332 रुग्णांपैकी 22 हजार 629 रुग्ण उपचार घेत असून गेल्या 24 तासात 380 रुग्ण बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 7 हजार 695 रुग्णांना प्रकृती सुधारल्यामुळेे घरी सोडण्यात आलेे आहे.









