ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 43 हजार 082 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 492 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 93 लाख 09 हजार 788 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 35 हजार 715 एवढी आहे.
गुरुवारी दिवसभरात 39,379 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 4 लाख 55 हजार 555 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 87 लाख 18 हजार 517 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 13 कोटी 70 लाख 62 हजार 749 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 31 हजार 204 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.26) करण्यात आल्या.