कोरोगाग्रस्तांची संख्या 14 हजार 379वर
480 जणांचा मृत्यू, 1992 रूग्ण पूर्ण बरे , केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात गेल्या 24 तासांमध्ये 991 नवे रूग्ण आढळले तर 43 जणांचा मृत्यू झाला. एकुण रूग्णसंख्या 14 हजार 378 इतकी झाली आहे. 1992 जण पूर्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी शनिवारी दिली. 12 राज्यांमध्ये मागील 22 दिवसांमध्ये एकही कोरोनाचा नवा रूग्ण आढळला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी दिवसभरात गुजरातमध्ये सर्वाधिक 176 रूग्ण आढळले. आहेत. देशात कोरोना झालेल्या रूग्णांच्या मृत्यूची टक्केवारी 3.3 इतकी आहे. मृतांमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या रूग्ण सर्वाधिक आहेत. तर 45 ते 60 वर्षाचे रूग्ण 10. 3 टक्के तर 45 वर्षाच्या आतील 14 टक्के रूग्णांचे मृत्यू झाल्याचेही अग्रवाल यांनी नमूद केले.
तबलगी जमातीच्या कार्यक्रमामुळे 23 राज्यात फैलाव
देशातील एकुण रूग्णसंख्येपैकी 29.8 टक्के रूग्ण हे तबलिगी जमातीचे आहेत. दिल्लीत मार्च महिन्यात जमातच्या कार्यक्रमामुळे तब्बल 23 राज्यांमध्ये रूग्णसंख्या वाढली, असा पुन्नरूच्चारही त्यांनी केला. एकटा दिल्लीत 63 टक्के रूग्ण हे तबलीगी जमातीचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
विदेशातील नागरिकांच्या व्हिसा कालावधीत होणार वाढ
विदेशी नागरिकांच्या व्हिसा (देशात राहण्यास दिलेली परवानगी)कालावधीत वाढ करण्यात येईल. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे भारतात वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये वाढ केली जाईल, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.









