ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात 3 कोटी 28 हजार 709 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 89 लाख 94 हजार 855 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सध्या 6 लाख 43 हजार 194 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मंगळवारी 50 हजार 848 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 68 हजार 817 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 1358 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 90 हजार 660 एवढी आहे.









