ऑनलाईन टीम/तरुण भारत
संपूर्ण जगावर ओमिक्रॉनया कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं संकट आहे. आपल्या देशात देखील ओमिक्रॉनचे ५ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण देखील सापडत आहेत. गेल्या २४ तासांत देशात ८८९५ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कोरोना मृत्यूंच्या आकड्यात अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत २७९६ इतक्या मृत्यूची नोंद करण्यात आली. बिहारमध्ये यापूर्वी 2,426 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, त्यांची नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे गेल्या २४ तासांत या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तसेच केरळमधील देखील २६३ मृत्यूंच्या आकड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा अचानक वाढला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.