ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर आता काही प्रमाणात कमी होऊ लागले आहेत. तरीही देशात मागील ९ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी ९ व्या दिवशी ८ व्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरत 80 पैसे प्रतिलिटरने वाढ करण्यात आली आहे. ५ महिन्यांनी दिल्लीत पेट्रोल पुन्हा १०० रुपये प्रतिलिटर या दरावर पोहोचले आहे.
दरम्यान, सतत वाढणाऱ्या इधनाच्या दरांमुळं सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईसह देशभरात मागील ९ दिवसांमधील आठव्यांदा दरवाढ झाली आहे. विशेष म्हणजचे पेट्रोलनंतर आता डिझेलच्या किंमतीनं ही शंभरी गाठली आहे. मुंबईत पेट्रोल ८४ पैसे आणि डिझेल प्रतिलिटर ८५ पैशांनी वाढले आहे. त्यामुळेच मुंबईत आता पेट्रोल ११५.८८ रुपये लिटर तर डिझेल १००.१० रुपये लिटर दराने मिळत आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मागील ९ दिवसात आठव्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. ९ दिवसांमध्ये इंधनाचे दर लिटरमागे ५ रुपये ६० पैशांनी वाढलं आहे. पेट्रोलच्या दरात ८० पैसे आणि डिझेलच्या दरात ७० पैशांची वाढ करण्यात आल्यानं या देशभरातील मोठ्या शहरात पेट्रोलच्या दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मंगळवारी पहिल्यांदा दिल्लीत पेट्रोलचा दर १००.२१ रुपये प्रति लिटर झाला. यात आता ८० पैशांनी भर पडल्याने दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०१.०१ रुपयांना मिळत आहे.