ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात 93 लाख 92 हजार 920 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 88 लाख 02 हजार 267 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
मागील 24 तासात देशात 41 हजार 810 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 496 रुग्णांचा मृत्यू झाला. 93.92 लाख रुग्णसंख्येपैकी सध्या 4 लाख 53 हजार 956 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात 1 लाख 36 हजार 696 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
देशात आतापर्यंत 13 कोटी 95 लाख 03 हजार 803 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 12 लाख 83 हजार 449 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.28) करण्यात आल्या.









