ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि टीम इंडियाचा अष्टपैलू गोलंदाज हार्दिक पांडय़ा यांनी उपस्थिती लावली.
या दरम्यान गडकरी आणि फडणवीस यांनी हार्दिक पांडय़ा सोबत क्रिकेट खेळाचा आनंद घेतला. यावेळी गडकरी आणि फडणवीस यांनी गोलंदाजी करत पांडय़ाला बाद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पांडय़ाने जोरदार फलंदाजी केली. मात्र देवेंद्र फडणवीसांनी टाकलेल्या चेंडूवर हार्दिक क्लिन बोल्ड झाला.









