वीरेश हिरेमठ व सहकाऱयांचा उपक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
एखाद्या देवदेवतांची प्रतिमा भग्न झाल्यानंतर व्यवस्थितपणे तिची विल्हेवाट लावण्याची गरज असते. मात्र, अनेक जण योग्यरीत्या विल्हेवाट न लावता रस्त्याशेजारी, ओढय़ाजवळ, नदीकाठावर, झाडाखाली, अस्वच्छ ठिकाणी टाकून देतात. अशा प्रतिमा जमविण्याचे काम तरुणांनी हाती घेतले आहे.
सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी रविवारी बेळगाव येथील विमानतळाला जाणाऱया मार्गाशेजारी झाडाखाली ठेवलेल्या प्रतिमा जमविल्या आहेत. या उपक्रमात सागर मारुती संताजी, दीपक चौगुले, महेश रेड्डी, करण भोसले, बाळू कणबरकर, लिंगय्या बुर्लकट्टी, मारुती पाटील, जोतिबा अनगोळकर आदींनी भाग घेतला.
सांबरा रोडवर ठेवलेल्या प्रतिमा गोळा करून त्या युवकांनी ताब्यात घेतल्या. गेल्या काही महिन्यांपासून या तरुणांनी बेळगाव, खानापूर तालुक्मयातील विविध गावात हा उपक्रम राबविला आहे. भग्न प्रतिमा एकत्र करून धार्मिक विधीनुसार या प्रतिमांचे विसर्जन करण्याचे काम हे तरुण करीत आहेत. देवदेवतांची विटंबना टाळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे वीरेश हिरेमठ यांनी सांगितले.









