प्रतिनिधी / कोल्हापूर
देवकर पाणंद येथील मनोरम नगर येथे सोमवारी दुपारी एक महिलेचा मृतदेह आढळून आला. पोत्यामध्ये गुंडाळुन रस्त्याकडेला एक चरीमध्ये कचऱ्यात मृतदेह आढळला .यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. अंदाजे 25 ते 35 वयोगटातील ही महिला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास देवकर पाणंद येथील मनोरमा नगर येथील एकता ग्रुपजवळ रस्त्याकडेला एक कचरा कोंडाळा आहे. महापालिका कर्मचारी कचरा साफ करत असताना त्यांना उग्र वास आला. सफाई कर्मचाऱ्याने कचऱ्यातिल एक पोते उघडले. यामध्ये एक मृतदेह असल्याचे दिसून आले. त्याने या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाले, पोलीस उप निरीक्षक संदीप जाधव हे घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी या घटनेची माहिती शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण यांना दिली. त्यांनी घटना स्थळी धाव घेत सिमेंटचे पोते उलगडून बघितले. यामध्ये 25 ते 35 वयोगटातील महिलेचा मृतदेह असल्याचे दिसून आले. घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील नागरिकाकांडे चौकशी सुरू केली आहे.