चौके/वार्ताहर-
कुडाळ वरून मालवणकडे दूधाची वाहतुक करणारा टेम्पो टॅव्हलचा चौके कुडाळ रस्तावरती चौके नारायणवाडी या ठिकाणी अपघात घडल्याची घटना घडली.या अपघातामध्ये टेम्पोचे बरेच नुकसान झाले आहे.हा अपघात रविवारी रात्रौ तीनच्या दरम्याने घडला.
गडहिंग्लच या ठिकाणा वरून दुधाची वाहतूक करणारा टेम्पो MH23AU4097 हा कुडाळ चौके या रस्तावरून जात असताना चौके नारायणवाडी या ठिकाणी चौके स्मशानभूमी जवळ चालकांचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्ताच्या बाजूला असणार्या झाडाला जाऊन धडकला.या अपघातामध्ये टेम्पोचा समोरील भागाचे बरेच नुकसान झाले.यावेळी या टेम्पोमध्ये वाहन चालक व अन्य एकजण प्रवाश करित होता.मात्र यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची ईजा पोहचली नाही.मात्र रात्रौच्यावेळी या रस्तावरून वाहतूक करणार्या डंपरने लाईट मारल्यामुळे गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे टेम्पो चालकांने सांगितले.टेम्पो पंधरा दिवसापूर्वी खरेदी केलेला होता.यामध्ये टेम्पोचे बरेच नुकसान झालेले आहे.









