प्रतिनिधी/ बेळगाव
दुसऱया टप्प्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचे उमदेवारी अर्ज दाखल करण्यात शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी 134 अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात जास्त सौंदत्ती तालुक्यात 43 अर्ज दाखल झाले आहेत. त्या खालोखाल चिकोडी तालुक्यात 27 अर्ज दाखल झाले आहेत. निपाणी 22, रायबाग 16, रामदुर्ग 15, अथणी 6, कागवाड 5 अर्ज दाखल झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. रात्री उशिरापर्यंत अर्जांच्या आकडेवाडीचा हिशोब सुरु होता. आता पहिल्या टप्प्यातील अर्ज माघारीचा दिवस सोमवारी असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
येळ्ळुरात 30 जागांसाठी 90 जणांचे अर्ज
बेळगाव तालुक्यात मोठी ग्रा. पं. म्हणून ओळख असलेल्या येळ्ळूर गावात 30 जागांसाठी 90 अर्ज दाखल झाले आहेत. मोजक्याच जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दि. 14 रोजी माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे रिंगणात कितीजण राहणार आहेत हे त्या दिवशी स्पष्ट होणार आहे.









