आठवडय़ात दुसऱ्यांदा बिघाड, नागरीकांमधून संताप व्यक्त
प्रतिनिधी / बेळगाव
‘नकटीच्या लग्नाला विघ्ने फार’ असे म्हणण्याची वेळ बेळगावच्या नागरीकांना येत आहे. टिळकवाडी येथील दुसरा रेल्वेगेट येथील फाटक शनिवारी पुन्हा एकदा नादुरूस्त झाले आहे. आठवडय़ाभरात दुसऱ्यांदा बिघाड झाल्यामुळे काहीकाळ वाहतुकीसाठी हा रेल्वेगेट बंद करण्यात आला होता. यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी एका कार चालकाच्या अतातायीपणामुळे दुसरा रेल्वेगेट मोडून वाकले होते. त्याची तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करण्यात आली होती. परंतु चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा गेट कोसळले. निकृष्ट प्रतीचे दुरूस्तीचे काम करण्यात येत असल्यामुळे वारंवार असे प्रकार घडत असल्याची तक्रार नागरीकांनी मांडली.
नागरीकांच्या जीवाशी खेळ
शनिवारी ऐन सणासुदीच्या काळात दुपारी रेल्वेगेट नादुरूस्त झाले. यामुळे काहीकाळ वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहनचालकांना पहिल्या किंवा तिसऱया रेल्वेगेटमार्गे प्रवास करावा लागत होता. या रेल्वेगेट नेहमीच वाहनचालकांनी मोठी असल्याने एखादेवेळी एखाद्यावेळी वाहनचालकाच्या हा गेट अंगावर पडून कोणताही अपघात झाल्यास रेल्वे विभाग त्याची जबाबादारी घेणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.









