15 जणांचाच दौडमध्ये असणार सहभाग : समाज हितासाठी घेतला निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मागील वषी साध्या पद्धतीने व निवडक धारकऱयांच्या उपस्थितीत दुर्गामाता दौड पार पडली. अद्याप कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नसल्याने यावषीही साध्या पद्धतीने दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढून आपल्याच व्यक्तींना धोका पोहोचू नये या सामाजिक हेतूने यावषी साध्या पद्धतीने दौड काढण्याची भूमिका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने घेण्यात आली आहे.
दरवषी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौडमध्ये हजारोच्या संख्येने धारकरी सहभागी होतात. महाराष्ट्रापेक्षाही मोठी दौड बेळगावमध्ये काढली जाते. संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली दुर्गादेवीचा जागर करत शिवशंभूच्या जयघोषात 9 दिवस दुर्गामाता दौड होत असते. दरवषीप्रमाणे यावषीही भव्य दौडला परवानगी द्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानने जिल्हा प्रशासनासोबतच पोलीस प्रशासनाला केली होती.
बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे दौड साध्या पद्धतीने व निवडक धारकऱयांच्या उपस्थितीत आयोजित करावी, अशी विनंती शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांना केली होती. समाजहिताच्यादृष्टीने 15 धारकऱयांच्या उपस्थितीत गुरुवार दि. 7 ते शुक्रवार दि. 15 या दरम्यान दौड काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारकऱयांची नावे विभागप्रमुखांद्वारे कळविण्यात येतील, असे जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी सांगितले.
असा आहे दौडचा मार्ग
गुरुवार दि. 7 रोजी शिवाजी उद्यान येथून दौडला प्रारंभ होऊन एसपीएम रोड मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे सांगता होणार आहे. शुक्रवार दि. 8 रोजी शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथून पहिले रेल्वे गेट, देशमुख रोड, आरपीडी चौक, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड, धर्मवीर संभाजी चौक, भांदूर गल्ली क्रॉस, महालक्ष्मी मंदिर येथे दौडची सांगता होईल. शनिवार दि. 9 रोजी चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिर येथून दौडला सुरुवात होऊन आरटीओ सर्कलमार्गे किल्ला येथील दुर्गामाता मंदिर येथे सांगता होईल. रविवार दि. 10 रोजी शहापूर येथील आंबाबाई मंदिरपासून प्रारंभ होऊन नाथ पै चौक, कंकणवाडी हॉस्पिटल रोड, गोवावेस रोड येथील बसवेश्वर सर्कल येथे सांगता होईल. सोमवार दि. 11 रोजी बसवाण्णा मंदिर नेहरुनगर येथून दौडला प्रारंभ होऊन नेहरुनगर दुसरा क्रॉस, रामदेव हॉटेल, दुर्गामाता चौक, शिवबसवनगर, जोतिबा मंदिर येथे सांगता.
मंगळवार दि. 12 रोजी दुर्गामाता मंदिर खासबाग येथून दौडला प्रारंभ होऊन बाजार गल्ली वडगाव, हरिमंदिर क्रॉस, विष्णू गल्ली, मंगाई मंदिर येथे सांगता होईल. बुधवार दि. 13 रोजी मिलिटरी महादेव येथील शिवतीर्थ येथून दौडला प्रारंभ होऊन काँग्रेस रोड, गोगटे सर्कल, खानापूर रोड, संचयनी सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, यंदेखूट, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक येथे सांगता होणार आहे. गुरुवार दि. 14 रोजी सोमनाथ मंदिर ताशिलदार गल्ली येथून दौडला प्रारंभ होऊन हेमूकलानी चौक, स्टेशनरोड मार्गे शनिमंदिर येथे सांगता होईल. शुक्रवार दि. 15 रोजी मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून दौडला प्रारंभ होऊन बसवाण गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता होईल.
शिवचरित्र पारायण करावे.
यावषी दुर्गामाता दौडमध्ये केवळ 15 धारकऱयांना सहभागी होता येणार असल्याने अनेक धारकऱयांचा हिरमोड झाला आहे. परंतु धारकऱयांनी नाराज न होता दौड दरम्यान शिवचरित्र पारायण करावे. गल्लीतील मंदिरांमध्ये शिवभक्तांनी एकत्रीत येवून रोज सकाळी शिवचरित्राचे पारायण करावे, असे आवाहन जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.









