प्रतिनिधी/सांगली
बायोमेडिकल कचरा महापालिकेच्या घंटागाडीत टाकल्याप्रकरणी शिंदेमळा येथील दुधनकर हॉस्पिटलला एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याने ही कारवाई केली असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्या धिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.
डॉ. ताटे म्हणाले, महापालिका क्षेत्रातील रुग्णालये, लॅब, डायगणोस्टिक सेंटर यांनी बायोमेडिकल कचरा हा उघड्यावर किंवा महापालिकेच्या कचरा कंटेकर अथवा घंटागाडीमध्ये न टाकता यासाठी नियुक्त सुर्या एजन्सीकडे जमा करायचा आहे. याचे उल्लंघन झाल्यास त्या रुग्णालयावर दंडात्मक कारवाई बरोबर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सूचना केल्या आहेत. तरीही दुधनकर हॉस्पिटलने या सूचनांचे उल्लंघन केले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








