1.25 कोटी मास्क, 1.5 कोटी पीपीईंचा पुरवठा होणार
कोरोना विरोधातील लढय़ासाठी शासकीय पातळीवर मोठी तयारी केली जात आहे. डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱयांचा सुरक्षेकरता पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट म्हणजेच पीपीई आणि एन95 मास्क आवश्यक आहे. या दोन्ही आवश्यक गोष्टींचा पुरवठा दिवसेंदिवस वाढविला जात आहे.
112.76 लाख एन95 मास्क आणि 157.32 लाख पीपीई किट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. यात 80 लाख पीपीई किट्सह मास्क स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहेत. सध्या पुरेशा प्रमाणात किट्स आणि मास्क उपलब्ध आहेत. दर आठवडय़ाला 10 लाख पीपीई किट्सचा पुरवठा प्राप्त करण्याचे लक्ष्य आहे.
चीनकडून पीपीई किट्स
वेळेत मेडिकल किट्सचा पुरवठा व्हावा याकरता सरकार देशातच उपकरणांच्या निर्मितीची तयारी करत आहे. याचबरोबर विदेशांमधून आयात केली जात आहे. आयातीची पहिली खेप चीनमधून दाखल झाली आहे. 6 एप्रिल रोजी चीनमधून 1.70 लाख पीपीईची खेप सरकारला मिळाली आहे. तर 20 हजार पीपीई किट्स भारतातच तयार करण्यात आले आहेत. यासह देशात यापूर्वीच 387473 पीपीई किट्स उपलब्ध आहेत. चीनकडून 60 लाख पीपीई किट्स आयात करण्याचा व्यवहार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 80 लाख पीपीई किट्सची ऑर्डर सिंगापूरला देण्यात आली आहे. 80 लाख किट्स 11 एप्रिलपासून उपलब्ध होतील.
प्रतिदिनी 80 हजार मास्कचे लक्ष्य
भारतात सध्या पीपीई किट्स उत्तर रेल्वेकडून तयार करण्यात येत आहे. डीआरडीओने मास्क आणि किट्सची निर्मिती केली आहे. प्रतिदिनी 80 हजार मास्क निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. केंद्र सरकारकडून एकूण 20 लाखांपेक्षा अधिक एन95 मास्क देण्यात आले आहेत.









